कोची - केरळच्या पलक्कड पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सांप्रदायिक द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर पलक्कड महानगरपालिकेमध्ये सांप्रदायिक नारेबाजी केली. तसेच पालिकेच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम असा मजकूर लिहिलेला भव्य असा बॅनर झळकवला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सांप्रदायिक द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 153 अंतर्गत केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि काँग्रेसनेही याबाबत तक्रार केली होती. केरळच्या पलक्कडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते आणि अधिकारी पालिका भवनामध्ये पोहचले. यावेळी सांप्रदायिक नारेबाजी केली. तसेच पालिकेच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम असा मजकूर लिहिलेला भव्य असा बॅनर झळकवला. भाजपा नेता सी कृष्णकुमार आणि भाजपाचे राज्य महासचिव शिवराजन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी ही नारेबाजी केली.