नवी दिल्ली -भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. नरेंद्र मोदींची काश्मीर मुद्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बरळले, 'नरेंद्र मोदींची काश्मीर मुद्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही' - नरेंद्र मोदी
भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे.
भारतीय न्यायव्यवस्था सरकारच्या दबावामध्ये असून ती खंबीर उभी राहते की, मोदी सरकार पुढे झुकते हीच न्यायव्यवस्थेची परीक्षा आहे. भारताने काश्मीरमधील संचारबंदी काढावी, तेथील नेत्यांची आणि नागरिकांची सुटका करावी, असे ते म्हणाले.
भारताने जम्मू-काश्मीरचा विषेश दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरू आहे. पाकिस्तान जगभरात भारतविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाकचे हे मनसुबे अपयशी ठरत असून काश्मीर मुद्द्यावर एकाही देशाने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दिला नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये बंद दरवाज्याआड चर्चा झाली. मात्र, यातूनही पाकिस्तानच्या हाती काही लागले नाही.