महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग; पूंछच्या सीमारेषेवर गोळीबार

भारताला चिथावणी देण्यासाठी पाकिस्तानने बागलकोट क्षेत्रातील सीमारेषेवर सकाळी सव्वा दहा वाजता गोळीबार केला. या गोळीबाराला सीमारेषेची सुरक्षा करणाऱ्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्याने दिली.

संग्रहित - सीमेवर गस्त घालणारे भारतीय सैनिक
संग्रहित - सीमेवर गस्त घालणारे भारतीय सैनिक

By

Published : Aug 10, 2020, 1:44 PM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)– संपूर्ण जग कोरोनाशी लढाई करत असताना पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानच्या सैनिकांनी आज शस्त्रसंधीचा भंग केला आहे. पाकच्या सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या पुंछ सीमारेषेवर सोमवारी गोळीबार गेल्याचे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

भारताला चिथावणी देण्यासाठी पाकिस्तानने बागलकोट क्षेत्रातील सीमारेषेवर सकाळी सव्वा दहा वाजता गोळीबार केला. या गोळीबाराला सीमारेषेची सुरक्षा करणाऱ्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्याने दिली. पाकच्या गोळीबारात कोणतीही जीवतिहानी झाली. पाकिस्तानच्या सैन्यदलाने टारकुंडी गावात तोफगोळ्यांनी मारा केला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी रविवारीदेखील मानकोट, शाहपूर, किर्नी आणि कृष्णा या क्षेत्रात अंदाधुंद गोळीबार केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details