महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राफेलचे शस्त्रपूजन : राजनाथ सिंह यांच्या बचावसाठी धावला पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता - Asif Ghafoor Defends Rajnath Singh

राजनाथ सिंह यांच्या बचावसाठी चक्क पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी टि्वट करुन सिंह यांचे समर्थन केले आहे.

असिफ गफूर

By

Published : Oct 11, 2019, 1:08 PM IST

नवी दिल्ली -केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. राफेलच्या पूजनामुळे नेटीझन्सकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यावर राजनाथ सिंह यांच्या बचावसाठी चक्क पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी टि्वट करुन सिंह यांचे समर्थन केले आहे.

'राफेलची पूजा ही धर्मानुसार केली असून त्यामध्ये काहीच चुकीचे नाही. कारण ते धर्मानुसार आहे. कृपया लक्षात ठेवा... फक्त एकटी मशीन महत्त्वाची नाही. तर त्या मशीनला सांभाळणाऱ्या व्यक्तीची क्षमता, जोश आणि संकल्प महत्त्वाचा आहे', असे गफूर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे सबंध आहेत. काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सतत भारतावर टीका केली. त्यानंतर आज गफूर यांनी राजनाथ सिंह यांचे समर्थन करून अचंबित केले आहे.


फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी राजनाथ सिंह यांनी राफेलमधून उड्डाण करण्यापूर्वी त्याची शस्त्रपूजा करत ओम लिहिले. त्यानंतर विमानाला फुले आणि श्रीफळ वाहिले. याचबरोबर चाकाखाली लिंबू ठेवले होते. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे.


पहिले राफेल विमान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला. ८ ऑक्टोबर हा दिवस वायू सेना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच या दिवशी दसरा सणही असल्यामुळे ८ ऑक्टोबरची निवड करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details