महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खळबळजनक..! कर्नाटकातील झेडपीच्या शाळेत 'पाकिस्तान जिंदाबाद'चा मजकूर

बुदरशिंगी गावातील एका जिल्हा परिषद शाळेतील भिंतीवर 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'टिपू सुलतान स्कूल' अशा आशयाचा वादग्रस्त मजकूर आढळून आला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली असून शिक्षक व ग्रामस्थांशी चर्चा केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

pakistan-zindabad-and-tipu-sultan-school-slogan-on-wall-of-govt-school-in-karnatka
pakistan-zindabad-and-tipu-sultan-school-slogan-on-wall-of-govt-school-in-karnatka

By

Published : Feb 26, 2020, 11:33 AM IST

कर्नाटक- हुबळी जिल्ह्यातील बुदरशिंगी गावातील एका जिल्हा परिषद शाळेतील भिंतीवर 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'टिपू सुलतान स्कूल' अशा आशयाचा वादग्रस्त मजकूर आढळून आला आहे. यामुळे शाळेत काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, काश्मीरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. त्यातच आता हा प्रकार उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होसनी मुबारक यांचा मृत्यू; तीन दशके होते सत्ताधीश

सोमवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक शाळेत आल्यानंतर त्यांना शाळेतील भिंतीवर आणि दरवाजावर 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'टिपू सुलतान स्कूल' अशा घोषणा खडूने लिहिल्याच्या आढळल्या. ही घटना रविवारी रात्री घडल्याचा संशय आहे. या घोषणामुळे शाळेत काही वेळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून याबाबत तपासाची मागणी शाळा प्रशासनाने केली.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली असून शिक्षक व ग्रामस्थांशी चर्चा केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details