महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

येत्या काळात पाकिस्तानचे आणखी ५-६ तुकडे होतील - आरएसएस नेते

पाकिस्तानात विभाजनवादी चळवळी जोर धरु लागल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे दोन भारताचे भाग असून ते पुन्हा मिळवण्यात येतील अशी विधाने केली आहेत.

आरएसएस नेते

By

Published : Sep 14, 2019, 7:48 AM IST

Updated : Sep 14, 2019, 9:52 AM IST

नवी दिल्ली -आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी पाकिस्तान दिवसेंदिवस कमजोर होत चालल्याचे म्हटले आहे. तसेच, अनेक तज्ज्ञही पाकिस्तानच्या विनाशाविषयी भाकिते वर्तवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यांची १९७१ मध्ये पुन्हा फाळणी झाली. आता पाकिस्तान आणखी ५-६ तुकडे होण्याच्या टोकावर आहे. पश्तूनिस्तान, बलुचिस्तान, सिंध वेगळे होऊ पहात आहेत,' असे इंद्रेश यांनी म्हटले आहे.

काश्मिरींना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे रॅली काढण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले.

हेही वाचा - संविधानाच्या मूळ प्रतीत राम, कृष्ण आणि भगवद् गीतेचा उल्लेख - रविशंकर प्रसाद

पाकिस्तानात विभाजनवादी चळवळी जोर धरु लागल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे दोन भारताचे भाग असून ते पुन्हा मिळवण्यात येतील अशी विधाने केली आहेत.

हेही वाचा - उदयनराजेंनी दिला खासदारकीचा राजीनामा; 'घड्याळ' झुगारुन घेणार 'कमळ' हाती

Last Updated : Sep 14, 2019, 9:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details