पुंछ (जम्मू काश्मीर)- पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमध्ये पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि मनकोट येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना भारताच्या एका जवानास वीरमरण आले आहे.
नौशेरा भागात पाकिस्तानकडून 5.30 वाजता पुन्हा गोळीबार करण्यात आला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने सुरुवातीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील पुंछ आणि कठुआ जिल्ह्यातील गावांमध्ये गोळीबार केला.