महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकच्या कुरापती सुरूच, पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन - शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याने सिमेजवळील लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष केले. मोठ्या प्रमाणात मोर्टार शेलींग करण्यात आली.

शस्त्रसंधीचे उल्लंघन

By

Published : Sep 21, 2019, 12:16 PM IST

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानने आज (शनिवारी) मध्यरात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जिल्ह्यातील बालाकोट, मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अंधाधुंद गोळीबार केला. याबरोबरच सकाळी १० च्या दरम्यान शहापूर आणि केरेन सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

पाकिस्तानी सैन्याने सीमेजवळील लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष केले. मोठ्या प्रमाणात मोर्टार शेलींग करण्यात आली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जम्मू काश्मीर राज्याची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पाकिस्तानकडून खटपट सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details