श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. कलाल आणि दिईंग गावांमध्ये पाकिस्तानच्या तोफेच्या गोळ्यांमुळे घरांचे नुकसान झाले आहे. तोफा आणि बंदुकांद्वारे पाकिस्ताकडून मारा करण्यात येत आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; राजौरी भागात घरांवर तोफगोळ्यांचा मारा - नौशेरा आणि राजौरी
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
![पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; राजौरी भागात घरांवर तोफगोळ्यांचा मारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4377108-654-4377108-1567950234650.jpg)
शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारतीय लष्कर पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्त्युत्तर देत आहे. कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नसल्याचे नौशेराचे पोलीस उपअधिक्षक ब्रिजेश यांनी सांगितले.