महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नियंत्रण रेषेवर पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान - Pakistan violated ceasefire

पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून अखनूर क्षेत्रामध्ये गोळीबार करण्यात आला.

नियंत्रण रेषेवर गोळीबार
नियंत्रण रेषेवर गोळीबार

By

Published : Dec 21, 2019, 7:33 PM IST

श्रीनगर -पाकिस्तानी सैन्याने आपले 'नापाक इरादे' अजूनही सोडलेले नाहीत. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून अखनूर क्षेत्रामध्ये गोळीबार करण्यात आला. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले आहेत.

भारतीय जवानांकडून पाकिस्तानी सैनिकांचे एक तळदेखील उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. अखनूर आणि पलांवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

सोमवारी पाककडून झालेल्या गोळीबारात एक भारतीय सैनिक हुतात्मा झाला. ही घटना नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरमध्ये घडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details