महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लष्कराचे प्रत्युत्तर - मेंढर शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 18, 2020, 3:14 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दुपारी १२. ३० आणि १.१५ च्या दरम्यान मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानने अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

१२ जानेवारीलाही पाकिस्तानी सैन्याने रात्री पुंछ जिल्ह्यात सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. सीमेवरील लष्करी चौक्या आणि नागरी वस्तीला पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले होते. रात्री ९.३० वाजता पाकिस्तानने सीमेपलीकडून देगवार सेक्टरमध्ये तोफगोळ्यांचा मारा केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details