महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तान काश्मीरमधील मशिदींचा वापर करत आहे - सुरक्षा तज्ज्ञ पी. के. सेहगल - mosques

'आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे उपद्व्याप सहन करणार नाही. मदरसे आणि मशिदी वारंवार पाकिस्तानला त्यांचा आणि त्यांच्या जागेचा वापर करण्याची मुभा देत आहेत,' असे सेहगल यांनी सांगितले.

पी. के. सेहगल

By

Published : Jul 31, 2019, 10:55 PM IST

नई दिल्ली -सरकारने काश्मीर खोऱ्यातील मशिदी आणि त्यांच्या व्यवस्थापनाचे तपशील मागवले आहेत. सुरक्षा विशेष तज्ज्ञ सेवानिवृत्त मेजर जनरल पी. के. सेहगल यांनी पाकिस्तान येथील मशिदी आणि मदरशांचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.

'सध्या जम्मू-काश्मीर आणि संपूर्ण देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे उपद्व्याप सहन करणार नाही. मदरसे आणि मशिदी वारंवार पाकिस्तानला त्यांचा आणि त्यांच्या जागेचा वापर करण्याची मुभा देत आहेत,' असे सेहगल यांनी सांगितले.

सुरक्षा तज्ज्ञ पी. के. सेहगल

त्यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३५A वरही मत व्यक्त केले. 'सध्या यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे. काश्मीर खोऱ्यातील विधानसभा निवडणुकांनतर यावर विचार केला जाईल,' असे सेहगल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details