श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये आत्तापर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांचा पुरवठा करत होता. मात्र, आता काश्मीरी नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग फैलावण्यासाठी ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काश्मीरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी याबाबतचे मत व्यक्त केले आहे.
पाकिस्तानची अशीही वाकडी चाल.. 'कोरोनाग्रस्तांना काश्मिरात घुसवण्याचा प्रयत्न - पाकिस्तान कोरोना बातमी
पाकिस्तान कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, ही चिंतेची बाब आहे. काश्मीरमधील नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावण्याच प्रयत्न पाकिस्तान करत आहे, त्यामुळे सतर्क होण्याची गरज आहे, असे दिलबाग सिंह म्हणाले.
पाकिस्तान कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, ही चिंतेची बाब आहे. काश्मीरमधील नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावण्याच प्रयत्न पाकिस्तान करत आहे. त्यामुळे सतर्क होण्याची गरज आहे, असे दिलबाग सिंह म्हणाले.
पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 10 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 212 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्येही 18 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीतही पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.