जम्मू-काश्मीर -पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यातील सैन्याच्या ठाण्यांवर गोळीबार करत रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.
जम्मू-काश्मीर : पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नियंत्रण रेषेजवळ पूंछ येथे गोळीबार - पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
शाहपूर सेक्टरमध्ये सकाळी 10.15 वाजता पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाल्याचे लष्कराने सांगितले. केर्णी आणि कसाबा या परिसरांवरही तोफगोळे डागल्याचे सांगण्यात आले.
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
शाहपूर सेक्टरमध्ये सकाळी 10.15 वाजता पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाल्याचे लष्कराने सांगितले. केर्णी आणि कसाबा या परिसरांवरही तोफगोळे डागल्याचे सांगण्यात आले.
या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. येथे जमिनीखाली बंकर्स बांधण्यात आल्याने लोकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला होता. भारतीय लष्करानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
TAGGED:
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन