महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानने उभारले 'कम्युनिकेशन हब'? भारतीय लष्करास सतर्कतेच्या सूचना - jammu kashmir news

दहशतवाद्यांना विविध ठिकाणांहून भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानने मोठे कम्युनिकेशन केंद्र तयार केल्याची माहिती मिळत आहे. याचा उपयोग करुन 50 ते 60 किलोमीटर अंतरावरुनही दहशतवाद्यांना आपल्या मार्गदर्शकाशी संवाद साधणे शक्य होणार आहे.

भारतीय सैन्य

By

Published : Aug 16, 2019, 10:40 PM IST

नवी दिल्ली- दहशतवाद्यांना विविध ठिकाणांहून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानने मोठे कम्युनिकेशन केंद्र तयार केल्याची माहिती मिळत आहे. याचा उपयोग करुन 50 ते 60 किलोमीटर अंतरावरुनही दहशतवाद्यांना सीमापार असलेल्या आपल्या मार्गदर्शकाशी संवाद साधणे शक्य होणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आल्याने पाकिस्तान बिथरला आहे. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तानने नीलम व्हॅली जवळील काली घाटी परिसरात कम्युनिकेशन केंद्र उभारल्याची माहिती सैन्यातील सुत्रांकडून देण्यात आली. या केंद्राचा उपयोग दहशतवाद्यांना होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेखातर भारतीय सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानी सैन्याच्या 3 जवानांचा खात्मा केला होता. पाकिस्ताकडून सीमेवर वारंवार गोळीबार होत असून याचा फायदा घेत पाकिस्तान काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details