श्रीनगर :सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून रविवारीपुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पूंछ येथील सीमेवर पाककडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला.
पूंछच्या मॅनकोट सेक्टरमध्ये पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यासोबतच छोटे ग्रेनेड्सही फेकण्यात आले. या हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
यावर्षीच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शस्त्रसंधीच्या तब्बल ३,१९० घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये २४ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी सैन्य वारंवार करत असलेल्या ग्रेनेड हल्ल्यांमुळे सीमाभागातील हजारो लोकांचे आयुष्य धोक्यात येत आहे. या हल्ल्यांमुळे लोकांची कुटुंबे, घरे, गाड्या आणि जनावरांचेही नुकसान होत आहे.
हेही वाचा :केरळमध्ये नौदलाच्या ग्लायडरचा अपघात; 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू