नवी दिल्ली - भारताविरोधात आवाज उठवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्याने पाकिस्तानी लष्कर समुद्रामार्गे गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्याने देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घुसखोरीद्वारे देशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट असल्याची माहिती मिळल्याने गुजरातमधील कांडला बंदराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सर क्रिक खाडीमधून पाकिस्तानचे विशेष कमांडो लहान बोटींद्वारे भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच गुजरातमधील कच्छ भागातून देशात घुसखोरी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.