इस्लामाबाद- पाकिस्तानने नागरी विमानांसाठी बंद केलेली हवाई हद्द आज (मंगळवार) पासून भारतासाठी खुली केली आहे. भारताने फेब्रुवारी महिन्यात बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची पूर्वेकडील हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. आता त्यावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत.
पाकिस्तान झुकला...! हवाई हद्द भारतीय विमानांसाठी केली खुली - balakot strike
बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने हवाई हद्द भारतासाठी खुली करण्यास नकार दिला होता. भारत सीमेवरील हवाई तळांवरील लढाऊ विमाने मागे घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तानची पूर्वेकडील हवाई सीमा भारतासाठी बंद असेल, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला होता.
बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने हवाई हद्द भारतासाठी खुली करण्यास नकार दिला होता. भारत सीमेजवळील हवाई तळांवरील लढाऊ विमाने मागे घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तानची पूर्वेकडील हवाई सीमा भारतासाठी बंद असेल, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला होता. हवाई हद्द नागरी विमानांसाठी खुली केल्याची माहिती पाकिस्तान नागरी उड्डान विभागाने दिली आहे. सर्व प्रकारच्या प्रवासी विमानांना हवाई हद्द खुली केल्याचे सूचना एका नोटीसीद्वारे देण्यात आली आहे.
पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने परदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या भारतीय विमानांना तसेच परेदशी विमान कंपन्याना पाकिस्तानला वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली होती. तसेच प्रवासासाठी वेळही जास्त लागत होता. एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये पाकिस्तानमधून जाणाऱ्या ११ हवाई मार्गांपैकी फक्त १ मार्ग खुला करण्यात आला होता. त्यामुळे परदेशी तसेच भारतीय विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. तसेच विमान प्रवासास अधिकचा वेळ लागत होता.