महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानने दहशतवाद्यांचा नायनाट करावा, भारताच्या भूमिकेत बदल नाही - रवीश कुमार - article 370

काश्मीर प्रश्न कसा सोडवायचा याबाबत भारताने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामध्ये बदल होणार नाही- रवीश कुमार

रविश कुमार

By

Published : Sep 26, 2019, 11:48 AM IST

न्युयॉर्क- दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत नाही, आधी पाकिस्तानने दहशतवाद संपवावा, मगच चर्चा शक्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले. तसेच काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून तिसऱ्या कुणाचीही मध्यस्थी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्युयॉर्क येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. काश्मीर प्रश्न कसा सोडवायचा याबाबत भारताने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामध्ये बदल होणार नाही. तर पाकिस्तानने दहशवाद्यांचा आधी नायनाट करावा, असे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे, भारताने हा मुद्दा कायम उचलून धरला आहे. तसेच दहशतवादाबाबत भारत आपल्या निर्णयावर ठाम आहे, असे कुमार म्हणाले.

चर्चेपासून भारत दूर पळत नाही. मात्र, चर्चेआधी पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कडक पावले उचलावीत. मात्र, पाकिस्तान कडून आम्हाला दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे कुमार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details