नवी दिल्ली -वित्तीय कारवाई दलाच्या (एफएटीएफ) आशिया-पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला फटकारले आहे. मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आणि इतर दहशतवाद्यांवर संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या निर्देशांनुसार कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने पुरेसे प्रयत्न केले नाहीत, असे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
पाकिस्तानच्या 'म्युच्युअल मुल्यांकन' अहवालात या ग्रुपने, पाकिस्तानला मनी लाँड्रिंग प्रकरणातून दहशतवाद्यांना पैसा पुरवला जाण्याच्या धोक्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. यासोबतच, पाकिस्तानमध्ये पैदा होत असलेल्या अल-कायदा, जेयुडी, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या धोक्याकडेही पाकिस्तानने लक्ष घालावे, असे त्यांना सांगितले गेले आहे.