नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तान आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. तर उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशाकडून केल्या जाणाऱ्या मिठाई देवाण-घेवाणीच्या प्रथेमध्ये खंड पडला आहे. आज भारतीय लष्कराने अटारी वाघा बॉर्डरवर दरवर्षीप्रमाणे पाक जवानांना मिठाई दिली नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाककडून मिठाईचे देवाण-घेवाण नाही - Pak
पाकिस्तान आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. तर उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशाकडून केल्या जाणाऱ्या मिठाई देवाण-घेवाणीच्या प्रथेमध्ये खंड पडला आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांच्या महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाच्या रक्षकांकडून मिठाईची देवाणघेवाण होत असते. पाकिस्तानने बकरी ईदच्या दिवशी ही मिठाईचे देवाणघेवाण होणार नाही, असा संदेश दिला होता.
कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान कावराबावरा झाला आहे. भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. याचबरोबर भारताबरोबर व्यापार, राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंतची आक्रमक भूमिका घेऊनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही.