नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन उद्या ९ नोव्हेंबरला करणार आहे. पाकिस्तानने या उद्घाटन समांरभासाठी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना आमंत्रण दिले आहे.
कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभ, श्री श्री रविशंकर यांना पाकिस्तानकडून आमंत्रण - कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन उद्या ९ नोव्हेंबरला
पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन उद्या ९ नोव्हेंबरला करणार आहे. पाकिस्तानने या उद्घाटन समांरभासाठी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना आमंत्रण दिले आहे.
पाकिस्तानने नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले असून नवज्योत यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाकिस्तानला जाण्यासाठी परवाणगी मागितली आहे. याचबरोबर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी प्रमुख पाहूणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रण दिल्याचं सांगितले होते. मात्र मनमोहन सिंग यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाहीये. तर आता पाकिस्ताने श्री.श्री रविशंकर यांना कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन समांरभामध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
शीखांचे पवित्र धर्मस्थळ गुरुद्वारा दरबार साहीब पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यामध्ये असून, भारत पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. पाकिस्तानच्या हद्दीत आहे. या ठिकाणी गुरुनानक यांनी १८ वर्षे वास्तव्य केले असून, त्यांनी अखेरचा श्वासही याच ठिकाणी घेतला. फाळणीनंतर हे पवित्र ठिकाण पाकिस्तानात गेल्याने भारतातील शीख धर्मीयांना या ठिकाणी जाण्यास अडचणी येत होत्या. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन करण्यात येणार असून, नोव्हेंबरमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. मागील वर्षापासून भारत व पाकिस्तान या प्रकल्पावर चर्चा करत होते.