महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

व्यापार, चित्रपटानंतर आता भारतीय जाहिरातींनाही पाकिस्तानकडून बंदी - कलम ३७०

पाकिस्तान सरकार चित्रपट सीडी विक्रेत्यांवर छापे मारत आहे. भारतीय चित्रपटंच्या सीडी जप्त करण्यासाठी पाकिस्तानचा हा आटापिटा  सुरू आहे.

जम्मू काश्मीर

By

Published : Aug 16, 2019, 3:21 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे विभाजन आणि ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान पुरता बिथरला आहे. पाकिस्तान सरकारने व्यापार, राजकीय संबध, चित्रपटांवरील बंदीनंतर आता भारतीय जाहिरातींवरही बंदी घातली आहे.

या निर्णयाचा कळस म्हणजे पाकिस्तान सरकार चित्रपट सीडी विक्रेत्यांवर छापे मारत आहे. भारतीय चित्रपटांच्या सीडी जप्त करण्यासाठी पाकिस्तानचा हा आटापिटा सुरू आहे. पाकिस्तान सरकार वाट्टेल त्या मार्गाने काश्मीर प्रश्न जगापुढे आणायला पाहत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details