इस्लामाबाद- २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. भारताच्या दहशतवादी विरोधी लढ्याचे हे मोठे यश समजले जात आहे. हाफिज सईद जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. अटक करुन हाफिजला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
'२६/११'चा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानात अटक - terrorist
२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे.
!['२६/११'चा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानात अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3862190-811-3862190-1563348690136.jpg)
दहशतवादी हफिज सईद
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सईदच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. हफीज सईदला अटक करुन पाकिस्तान सर्व जगाला मुर्ख बनवत आहे. न्यायालयामध्ये सईद विरुद्ध पाकिस्तान कसे पुरावे सादर करतोय, तसेच त्याला दोषी ठरवण्यासाठी किती प्रयत्न करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे एक नाटक ठरेल, असे निकम म्हणाले.
Last Updated : Jul 17, 2019, 1:50 PM IST