नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारे तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. किशन गंगा नदीच्या काठावर जवानांना दहशतवाद्यांच्या हालचाली आढळून आल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहीम राबवली. संबधित दहशतवादी हत्यारांची तस्करी करत होते. जवानांनी त्यांच्याकडून चार एके 74 रायफल, आठ मॅग्जीन आणि 240 एके रायफल दारूगोळा जप्त केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारांची तस्करी, जवानांनी उधळला कट
पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारांची तस्करीचा दहशतवाद्यांचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. जवानांनी त्यांच्याकडून चार एके 74 रायफल, आठ गन मॅग्झीन आणि 240 एके रायफल दारूगोळा जप्त केला आहे.
काश्मीर
पाकिस्तान लष्कर पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी उत्तर काश्मीरमधील केरेन सेक्टरमध्ये 9 ऑक्टोबरला जवानांना तैनात केले होते. तथापि, आज सकाळी कुलगाम जिल्ह्यातील चिंगाम प्रांतात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या ठिकाणी हल्लेखोर लपल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.
Last Updated : Oct 10, 2020, 1:39 PM IST