महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा फैलाव असतानाही कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्यास पाकिस्तानची तयारी - कर्तारपूर कॉरिडॉर बातमी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात येणार आहे. 'स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' म्हणजेच येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली तयार करण्याचे निमंत्रण पाकिस्तानने भारताला दिले आहे.

कर्तारपूर साहीब
कर्तारपूर साहीब

By

Published : Jun 27, 2020, 3:35 PM IST

इस्लामाबाद - तीन महिन्यांपासून जास्त काळ भारत आणि पाकिस्तानला जोडणारा कर्तारपूर कॉरिडॉर कोरोनाच्या फैलावामुळे बंद आहे. मात्र, सोमवारपासून (29 जून) कॉरिडॉर खुला करण्यास पाकिस्तानने तयारी दर्शवली आहे. जर कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाला तर शीख भाविकांना गुरु नानक देव गुरुद्वाराला दर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे.

सोमवारी शीख धर्मगुरु महाराज रणजीत सिंग यांची पुण्यतिथी आहे. याचे औचित्य साधून पाकिस्तानने कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती भारताला दिली असून, परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर भारताने 16 मार्चला कर्तारपूर साहीब धार्मिक स्थळी जाणाऱ्या भाविकांची नोंदणी तात्पुरती थांबवली होती. मात्र, आता जगभरातील धार्मिक स्थळे खुली होत असताना पाकिस्तानने कर्तारपूर गुरुद्वारा खुला करण्याची तयारी सुरू केली आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात येणार आहे. 'स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' म्हणजेच येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली तयार करण्याचे निमंत्रण पाकिस्तानने भारताला दिले आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अधिकृतपणे मोठा समारंभ करत दोन्ही देशांनी कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन केले. दोन्ही देशातील नागरिकांना धार्मिक स्थळाद्वारे जोडण्यासाठी हा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. कर्तारपूर गुरुद्वारा पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यात असून फाळणीनंतर शीखांचे पवित्र स्थळ पाकिस्तानात गेले. त्यामुळे भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर साहीबला जाण्यास अनेक अडचणी येत होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details