महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लष्कराचे प्रत्युत्तर - पुंछ जिल्हा बातमी

पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्री उशिरा पुंछ जिल्ह्यात सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शनिवारी रात्री ९.३० वाजता पाकिस्तानने सीमेपलीकडून देगवार सेक्टरमध्ये तोफगोळ्यांचा मारा केला.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 12, 2020, 8:17 AM IST

जम्मू - पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्री उशिरा पुंछ जिल्ह्यात सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमेवरील लष्करी चौक्या आणि नागरी वस्तीला पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले.

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी पुंछ जिल्ह्यात मदत पथकावर हल्ला केला. यात लष्कराच्या मदत पथकातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर तीनजण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री ९.३० वाजता पाकिस्तानने सीमेपलीकडून देगवार सेक्टरमध्ये तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय लष्करीने पाकिस्तानच्या या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी लष्कराने मालटी आणि कारमारा सेक्टरमध्येही गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लष्करी मदत पथकामधील मोहम्मद असलम(२८) आणि अल्ताफ हुसैन(२३) या दोघांना पाकिस्तानी लष्करातील बॅट पथकाने ठार केले आहे. यातील अस्लमचे शीर कापून टाकण्यात आले आहे. त्यावर काल लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनीही उत्तर दिले. अशा घृणास्पद कृत्यांना लष्करी कारवाईने उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details