महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारताला खोटे ठरवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान पुन्हा तोंडघशी' - बालाकोट

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर हे भारताला खोटे ठरवण्याच्या प्रयत्नात स्वत:च तोंडघशी पडले आहेत.

आसिफ गफूर

By

Published : Jul 28, 2019, 2:34 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान सतत खोटे बोलत असुन पुन्हा एकदा तोंडावर पडले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर हे भारताला खोटे ठरवण्याच्या प्रयत्नात स्वता:च तोंडघशी पडले आहेत.

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर २७ फेब्रुवारीला भारत- पाकिस्तानदरम्यान झालेल्या चकमकीत भारताचे नुकसान झाले होते, असे एक भारतीय निवृत्त अधिकारीच सांगत असल्याचे गफूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याला त्यांनी भारतीय वायु सेनाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या व्हिडिओचा संदर्भ दिला आहे. याचबरोबर गफूर यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ देखील यात मिक्स केला आहे.


मात्र हा व्हिडीओ शेअर केल्याच्या काही मिनिटांनंतरच त्यांच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा 2015 मधला असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये वीर च्रक आणि क्रिती चक्राने गौरवलेले एयर मार्शल डेंजील कीलोर हे 1962 आणि 1965 मधील युद्धाची माहिती देत आहेत. 1962 मध्ये भारत- पाकिस्तान दरम्यान तर 1965 मध्ये भारत-चीन दरम्यान युध्द झाले होते.


२७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. यामध्ये एफ-१६, जेएफ-१७ आणि मिराज ३, मिराज ५ या विमानांचा समावेश होता. ही विमाने भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच भारतीय वायूदलाला कळवण्यात आले. त्यानुसार भारताच्या सुखोई ३० एमकेआय, मिराज-२००० आणि मिग-२१ या विमानांनी पाकिस्तानच्या विमानांवर प्रतिहल्ला केला. भारताच्या या प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानी विमानांनी लगेच पळही काढला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details