महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा; 200 मिलियन डॉलर्सची मदत - कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा

बिल अॅन्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या तर्फे पाकिस्तानला 200 मिलियन डॉलर्सची मदत करण्यात येणार आहे.

कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा

By

Published : Sep 28, 2019, 8:11 AM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर बिल गेट्स आर्थिक मदत करणार आहेत. बिल अॅन्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या तर्फे पाकिस्तानला 200 मिलियन डॉलर्सची मदत करण्यात येणार आहे.

सध्या इमरान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बिल गेट्स यांची भेट घेतली गेट्ससोबत यांच्यासोबत इम्रान खान यांनी एमओयू साइन केलंय. हा सर्व फंड पाकिस्तानातील गरिबी दूर करणाऱ्या 'एहसास' या अभियानासाठी दिला जाणार आहे. हा फंड येत्या 2020 पर्यंत खर्च करण्यात येणार आहे. या मदतीसाठी इम्रान खान यांनी बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे आभार मानले आहेत.पाकिस्तान अन्य देशांकडून सातत्याने कर्ज घेत असून देशाची वाईट अवस्था झाली आहे. देशात आर्थीक मंदीची लाट आल्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. आशिया खंडातील देशावर संयुक्त राष्ट्राच्या 'ट्रेड आणि डेव्हलपमेंट' अहवालामध्ये पाकिस्तानच्या दिवाळखोरीची माहिती देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details