महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, तर गंदेरबाल जिल्ह्यात दहशताद्यांच्या हस्तकाला अटक - भारत पाक सीमा

पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सतत सुरुच आहे. पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टर आणि मानकोट सेक्टरमध्ये काल(मंगळवारी) रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

pak violates ceasefire
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 2, 2020, 9:15 AM IST

श्रीनगर- पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सतत सुरुच आहे. पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टर आणि मानकोट सेक्टरमध्ये काल (बुधवार) रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

हेही वाचा -'संसदेत संमत केलेल्या कायद्यांना राज्ये विरोध करू शकत नाहीत'

पाकिस्तानच्या गोळीबारात मानकोट सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. याबरोबरच पोलिसांनी गंदेरबाल जिल्ह्यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या हस्तकाला अटक केली. रईस लोन असे या हस्तकाचे नाव आहे. दहशतावादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -शोध मोहिमेदरम्यान काश्मीरमध्ये २ जवान हुतात्मा

काल (बुधवारी) जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान दोन सैनिकांना वीरमरण आले. राजुरी जिल्ह्यातील खारी तरायत जंगलातून पाकिस्तानी घुसखोर भारतात येण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यावेळी शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ जवानांना वीरमरण आले.

ABOUT THE AUTHOR

...view details