पूंच - एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटशी लढा देत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंच जिल्ह्यात सीमारेषेवर (एलओसी) वर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. संरक्षण विभागाच्या सुत्रांनी रविवारी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून पूंच जिल्ह्यातील किरनी, कस्बा आणि देगवार सेक्टर परिसरातील सीमारेषेवर छोटी शस्त्रास्त्रे, स्वयंचलित शस्त्रांसह गोळीबार करण्यात आला.