श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत कुपवाडा जिल्ह्यातील मच्चील सेक्टरमध्ये गोळीबार केला. दुपारी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांवर मशीनगन आणि तोफगोळ्यांनी मारा केल्याच्या वृत्ताला लष्करी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले. तसेच या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्कराने दिली. रविवारी (14 जून) पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी एक जवान शहीद तर दोनजण जखमी झाले होते.