महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर - LoC

या भागात पाकिस्तानी लष्कराकडून १ तास गोळीबार करण्यात आला होता. भारताकडून सीमेजवळील भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

चकमक

By

Published : Feb 28, 2019, 10:53 AM IST

श्रीनगर - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान एकीकडे सीमा तणाव कमी करण्यासाठी चर्चेची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैनिकांकडून सीमा परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. आजही पाकिस्तानने पुंछमधील कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघण केले. याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी ६ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघण करण्यात आले.

या भागात पाकिस्तानी लष्कराकडून १ तास गोळीबार करण्यात आला होता. भारताकडून सीमेजवळील भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय हवाईदलाकडून मंगळवारी पाकिस्तानातील जैशच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सीमाभागात पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाकिस्तानकडून करण्यात येत असलेला गोळीबार सकाळी ७ वाजताच्या सुमारास थांबला असून यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details