महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नौशेरा सेक्टरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक भारतीय जवान हुतात्मा - नौशेरा

पाकिस्तान लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्करातील एक जवान हुतात्मा झाला आहे.

शस्त्रसंधी

By

Published : Aug 23, 2019, 3:53 PM IST

श्रीनगर- पाकिस्तान लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्करातील एक जवान हुतात्मा झाला आहे. गुरखा रायफल्स मधील राजीब थापा असे त्या वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.

भारताने ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात येत आहे. दहा दिवसांपूर्वी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ३ जवानांचा खात्मा केला. यावेळी पाकिस्तानने भारताचे ५ जवान मारल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हा दावा खोडून काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details