नवी दिल्ली - सध्या भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे, तर दुसरीकडे याचाच फायदा घेऊन पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू पाहत असल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीरमधील आरएस पूरा आणि सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने बॉम्ब टाकून हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती सीमा सुरक्षा दलाला मिळाली असून संपूर्ण परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दहशतवाद! ड्रोनच्या मदतीने भारतीय हद्दीत हल्ला करण्याचा पाकचा डाव - ड्रोनच्या मदतीने दहशतवाद
जम्मू काश्मीरमधील आरएस पूरा आणि सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने बॉम्ब टाकून हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती सिमा सुरक्षा दलाला मिळाली असून संपूर्ण परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानची'आयएसआय' ड्रोनच्या मदतीने भारतीय परिसरामध्ये हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. याबाबत सीमा सुरक्षा दलाने भारतीय लष्कराला अलर्ट केले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था 'आयएसआयची' ड्रोनच्या मदतीने 'एके-47' रायफल, स्फोटके दशतवाद्यांना पोहचवण्याची योजना आहे. याबाबतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करणाऱ्या 5 संशयित लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी कंठस्नान घातले. ही माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.