महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन..पुंछमध्ये गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर

पुंछ जिल्ह्यातील मेंढर आणि बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने शुक्रवारी मध्यरात्री गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात येत असल्याची माहिती आहे.

loc
loc

By

Published : Apr 11, 2020, 10:44 AM IST

श्रीनगर - कुपवाडामध्ये शुक्रवारी सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले होते. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता पुंछमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानकडून सलग पाचव्या दिवशीही गोळीबार सुरुच ठेवला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील मेंढर आणि बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. याला भारतीय लष्कराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पुंछ जिल्ह्यातील मेंढर आणि बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने शुक्रवारी मध्यरात्री गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात येत असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details