इस्लामाबाद - पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने(सिनेट) काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सईद अली शाह गिलानी यास सर्वोच्च नागरी पुरस्कार निशाण-ए-पाकिस्तान देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. सरकारने गिलानीस हा पुरस्कार द्यावा, अशी मागणीही वरिष्ठ सभागृहाने संसदेत मांडली आहे. यातून पाकिस्तान काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीतील नेत्यांना प्रोत्साहन देत असल्याचे उघड झाले आहे.
काश्मिर फुटीरतावादी नेता गिलानीला पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार? - सईद गिलानी निशाण- ए- पाकिस्तान
काश्मीरमध्ये फुटीरतावादी चळवळ मागील 30 वर्षांपासून सुरु असून काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये वाद विकोपाला गेला आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाने एकमताने हा प्रस्ताव पास केला आहे. सईद अली गिलानी याने काश्मीरसाठी अविरत लढा दिल्याचे पाकिस्तानच्या संसदेने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावादी चळवळ मागील 30 वर्षांपासून सुरु असून काश्मीवरून दोन्ही देशांमध्ये वाद विकोपाला गेला आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाने एकमताने हा प्रस्ताव पास केला आहे. सईद अली गिलानी याने काश्मीरसाठी अविरत लढा दिल्याचे पाकिस्तानच्या संसदेने म्हटले आहे.
पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी गिलानी याची वचनबद्धता, समर्पण, चिकाटी आणि नेतृत्वासाठी कौतुक केले. काश्मिरातील अत्याचार गिलानी याने बाहेर आणल्याचा कांगावा पाकिस्तानाच्या संसदेने केला आहे. मात्र, मागील तीस वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे, हे अनेक वेळा पुराव्यानिशी भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी तळ असून त्याद्वारे काश्मीर आणि भारतात हल्ल्याचा कट पाकिस्तानद्वारे आखण्यात येतो. काश्मीरची स्वायत्तता रद्द केल्याच्या घटनेस 5 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही खेळी खेळली आहे.