महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या लष्कराने, जनतेने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहावे - इम्रान खान - Pulwama Attack

भारताच्या वायु दलाने आज पहाटे ३.३० वाजता नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोटवर हवाई हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा भारताच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही तळ उद्ध्वस्त झाले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

इम्रान खान

By

Published : Feb 26, 2019, 9:19 PM IST

इस्लामाबाद -भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडालेली आहे. अशातच पंतप्रधान इमरान खान यांनी देशामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आणि जनतेने पुढील घटनाक्रमासाठी धैर्याने तयार रहावे, असे त्यांनी म्हटले. परराष्ट्र मंत्रालय व लष्कर प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर खान यांनी पत्रकार परिषदेत असे वक्तव्य केले.

भारताच्या वायु दलाने आज पहाटे ३.३० वाजता नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोटवर हवाई हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा भारताच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही तळ उद्ध्वस्त झाले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

Imran Khan

बैठक झाल्यानंतर त्यांनी पाकच्या जनतेला सतर्क असण्याचे आवाहन केले. पुढील घटनाक्रमासाठी देशातील जनतेने आणि लष्कराने तयार असावे, असे त्यानी म्हटले. तर, भारताला या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाणार, अशी धमकी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने दिली आहे.

भारताने कोणत्याही प्रकारचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताने हा हल्ला मोकळ्या जागेवर केल्याच पाकचा दावा आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला ती जागा दाखवण्यासाठी पाकिस्तानने जगभरातील माध्यमांना निमंत्रण दिले आहे. मात्र, प्रतिकुल हवामानाची स्थिती असल्यामुळे सध्या तिथे जाता येणार नाही, असेही स्पष्टीकरणही त्यांनी दिले. त्यामुळे पाकिस्तान स्वतःच गोंधळात असल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details