महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इम्रान खान यांनी भारताविषयी शेअर केला व्हिडिओ... पण, निघाला खोटा; ट्विट डिलीट करण्याची नामुष्की - fake video caa attack

गुरू ननकाना साहिब स्थळी शीख भाविकांवर एक टोळक्याने हल्ला केला होता. या विषयापासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठीच इम्रान खान यांनी व्हिडिओ शेअर केले मात्र, ते व्हिडिओ खोटे होते.

इम्रान खान
इम्रान खान

By

Published : Jan 4, 2020, 1:06 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शीख धर्मीयांचे पवित्रस्थळ गुरू ननकाना देव दरबार येथे हिंसाचार घडल्यानंतर इम्रान खान यांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, इम्रान खान यामुळे तोंडघशी पडले आहेत. नागरिकत्व सुधारणा आंदोलनावरून भारतात चालू असलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ म्हणून त्यांनी बांगलादेशातील व्हिडिओ शेअर केले.

फेक व्हिडिओ स्क्रिनशॉट
उत्तरप्रदेशात पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत आहेत. मुस्लिमांना नष्ट करण्याची मोदींची जी योजना आहे, तिचाच हा भाग आहे, असे शीर्षक त्यांनी व्हिडिओला दिले आहे. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला. हे व्हिडिओ बांगलादेशातील असल्याचे समोर आले आहे. 'फेक व्हिडिओ' असल्याचे समजताच इम्रान खान यांनी ट्विटरवरून व्हिडिओ काढून टाकले आहेत.
फेक व्हिडिओ स्क्रिनशॉट
काल (शुक्रवारी) जमावाने गुरुद्वारावर दगडफेक करत गेट तोडण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले आहे. 'गुरुद्वारावर हल्ला करण्यापूर्वी हसनने एका सभेला संबोधित केले होते. शहरामध्ये एकाही शीख व्यक्तीला राहू देणार नाही. तसेच शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा ठेवणार', असे भाषण त्याने सभेत दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details