नवी दिल्ली - दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानने मुजाहिदीन दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचं मान्य केलं आहे. ८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानावर कब्जा केला होता, तेव्हा त्यांच्या विरोधात लढणाऱ्या मुजाहिदीन दहशतवाद्यांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिले. त्यांनी सोव्हियत संघाविरोधात जिहाद पुकारला. मात्र, त्यासाठी अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयए मदत पुरवत होती, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केले आहे.
अमेरिका जेव्हा एका दशकानंतर पुन्हा अफगाणिस्तानमध्ये आली तेव्हा पाकिस्तानातील मुजाहीदीन अमेरिकेलाच दहशतवादी समजू लागले. कारण, जिहादी असण्याचा त्यांचा उद्देश संपला होता. त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली. पाकिस्तानने तेव्हा तटस्थ रहायला हवे होते, असे इम्रान खान म्हणाले.