नवी दिल्ली - एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानासाठी एअरस्पेस नाकारणे हे दुर्दैवी आहे, असे मत भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
पाकिस्तानला आपल्या मूर्खपणाची लवकरच जाणीव होईल ही अपेक्षा आहे. याप्रकरणी एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेची घेण्याचा सध्या तरी आपला विचार नाही. मात्र, जर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करतो आहे, असे आढळून आले, तर नक्कीच ते पाऊलही उचलण्यात येईल, असे गोखले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा उघड.. पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्याचे मिळाले ताजे पुरावे
कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचेही प्रकार वाढले आहेत. तर पाकिस्तानचे नेते पातळी सोडून भारतावर आणि मोदींवर टीका करत आहेत.
यातच पाकिस्तानने मोदींसाठी एअरस्पेसदेखील बंद केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई सीमेमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करू शकणार नाहीत. पाकिस्तानने उचलेले हे पाऊल दुर्दैवी आणि मूर्खपणाचे आहे, असे मत भारताचे परराष्ट्र मंत्री विजय गोखले यांनी आज व्यक्त केले.
हेही वाचा : यंदाचा 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्कार मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना...!