इस्लामाबाद- पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांना एका भाषणादरम्यान विजेचा धक्का बसला. आपल्या भाषणात त्यांनी मोदींचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे, मोदींचे नाव घेतल्या क्षणी त्यांना विजेचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मोदींचे नाव घेताच पाक मंत्र्याला बसला '३७०'चा झटका! - Sheikh Rashid Ahmad
रशीद यांनी मोदींचे नाव घेतल्याक्षणी त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले, मला वाटते हा विजेचा धक्का होता. मात्र, मोदी आपल्या या कार्यक्रमाला थांबवू शकत नाहीत.
मोदींमुळे धक्का बसल्याचे स्वतःच केले मान्य..
रशीद यांनी मोदींचे नाव घेतल्याक्षणी त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले, मला वाटते हा विजेचा धक्का होता. मात्र, मोदी आपल्या या कार्यक्रमाला थांबवू शकत नाहीत.
रशीद खान यांनी याआधीही 'ऑक्टोबरमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध होऊ शकते, आणि हे दोन्ही देशांमधील शेवटचे युद्ध असेल' असे बाष्कळ विधान केले होते.
कलम ३७० रद्द झाल्यानंतर बिथरले आहेत पाकिस्तानी नेते..
भारत सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांसह नेते देखील युद्धाची भाषा करत आहेत. शिवाय सीमेवर पाकिस्तानी सेना शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करत आहे.