जम्मू काश्मीर - भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असताना एका दहशतवाद्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले. जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातून भारतात शिरण्याचा दहशतवाद्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी गुरुवारी रात्री उधळून लावला.
हेही वाचा -काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीला सुरुवात; जनजीवन विस्कळीत
सांबा जिल्ह्यातील मंगुचूक भागातून एक दहशतवादी भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्याला ठार केले. आणखी घुसखोर सीमेपलीकडून आत आले आहेत का? याचा शोध जवानांनी सुरू केला आहे.
हेही वाचा -#PlasticFreeIndia: पानांचे द्रोण ठरत आहेत प्लास्टिकमुक्त भारतासाठी वरदान !
पाकिस्तानी बाजूने सीमेवर संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती बीएसएफला मिळाली आहे. ट्विटरवरून याबाबतची माहिती बीएसएफने दिली आहे. सीमा सुरक्षा दल सतर्क असल्याची माहिती ट्विटद्वारे बीएसएफने दिली आहे.