महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या 'त्या' पाक सैनिकाचा खात्मा - पाक सैनिकाचा खात्मा

भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणाऱया पाकिस्तानी जवानाचा गोळीबारादरम्यान खात्मा करण्यात आला आहे.

विंग कमांडर अभिनंदन

By

Published : Aug 20, 2019, 7:33 PM IST

नवी दिल्ली - भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणाऱया पाकिस्तानी जवानाचा गोळीबारादरम्यान खात्मा करण्यात आला आहे. अहमद खान असे या पाक सैनिकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. १७ ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारात अहमद खान ठार झाला.

बालाकोट हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावानंतर भारत पाकिस्तानमध्ये एकमेकांविरुद्ध हवाई हल्ले करण्यात आले होते. त्यावेळी भारताचे लढाऊ विमान 'मिग -२१' पाक व्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. त्यावेळी अहमद खान याने भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांचा छळ केला होता.

अहमद खान नौशेरा, सुंदरबनी आणि पालनवाला सेक्टर येथे सुभेदार म्हणून कार्यरत होता. अलिकडेच त्याला पाकिस्तानी सैन्याने घुसखोरांना भारतात पाठविण्याचे काम दिले होते. दरम्यान घुसखोरांना भारतामध्ये पाठवत असताना झालेल्या गोळीबारात तो ठार झाला. १७ ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेजवळील नायकल सेक्टर येथे गोळीबारा दरम्यान तो ठार झाला.

अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानकडून एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये दाढीमध्ये असलेला अहमद खान देखील पाहायला मिळतो. हवाई हल्ला चालू असताना 'मिग २१' कोसळले होते. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते.

अहमद जैश- ए- मोहम्मह या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत होता. १७ ऑगस्ट रोजी पुंछ येथील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदलावर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचे नियोजन होता. मात्र, भारतीय सैन्यदलाने अतिशय शिताफीने पलटवार करुन अहमदचा खात्मा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details