जम्मू काश्मीर - पाकिस्तानी लष्कराने आज(शुक्रवार) पुंछ जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला.
जम्मू काश्मीर : पुंछ जिल्ह्यात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन - पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
लहान तोफा आणि मोर्टार शेलने पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यातील शहापूर, किरनी आणि कसबा सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला.
'लहान तोफा आणि मोर्टार शेलने पाकिस्तानी लष्कराने शहापूर, किरनी आणि कसबा सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. त्यास भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले' अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.
कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने १ ऑक्टोबरला शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद तर एकजण जखमी झाला होता. २ सप्टेंबरला झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. ५ सप्टेंबरलाही पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. यात एक जवान शहीद झाला होता तर दोन जण जखमी झाले होते.