नवी दिल्ली - भारताशी सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून कुरापती काढणाऱ्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या कारवाईत ३ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या प्रेस रिलीजवरुन ही माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचे भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
भारताच्या गोळीबारात ३ पाक सैनिक ठार, आकडा जास्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे - sources
राकचक्री, रावळकोट येथे ही कारवाई करण्यात आली. पाक लष्कराच्या सात चौक्या उद्धवस्त केल्या. ३ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. पाकिस्तानच्या प्रेस रिलीजवरुन ही माहिती समोर आली आहे. हा आकडा जास्त असल्याचे भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
३ पाक सैनिक ठार
राकचक्री, रावळकोट येथे ही कारवाई करण्यात आली. तसेच, पाक लष्कराच्या सात चौक्या उद्धवस्त केल्या. काल पाकिस्तानच्या या गोळीबारात एका ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर, अनेक नागरीक जखमी झाले होते. पाकिस्तानने सोमवारी केलेल्या तोफ गोळयांच्या माऱ्यात तिघांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले होते. त्यामुळे भारतीय सैन्याकडून आज ही कारवाई करण्यात आली.