इस्लामाबाद (पाकिस्तान) - 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. यातच त्यांनी मंत्रीमंडळाने घेतलेल्या बैठकीतील ठरावांवर तडकाफडकी निर्णय घेत, भारतासोबतचा द्विपक्षीय करार रद्द केला होता. मात्र, आता पाकिस्तानवर कॅन्सर, ह्रदयरोग व इतर आजारांवर लागणाऱया जिवनावश्यक औषधासंबंधीची बंदी उठवण्याची नामुष्की ओढावल्याने त्यांनी भारताकडून येणाऱ्या औषधांची पुन्हा आयात सुरू केली आहे.
तणावपूर्ण संबंधातही पाकिस्तान भारताकडून या गोष्टीची करणार आयात - article 370 pakistan
370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. यातच त्यांनी भारतासोबतचा द्विपक्षीय करार रद्द केला होता.
भारत आणि पाकिस्तान व्यापार
औषधासंबंधीचा निर्णय सोमवारी पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाकडून घेण्यात आला. याआगोदर जम्मु काश्मिरातून 370 कलम काढून टाकल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापारावर मोठे पडसाद उमटले होते. यात उभय देशातील 2 रेल्वे गाड्या, बसेस रद्द करण्यात आल्या होत्या