दिल्ली - वायुसेनेने कामगिरी बजावल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आम्हीच पहिल्यांदा केला होता. या संबंधीचे ट्वीटही आम्हीच पहिल्यांदा केले होते. सैन्याच्या कामगिरीवर आम्ही प्रश्न उपस्थित केलाच नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते माजी अर्थमंत्री पी. बी. चिदम्बरम यांनी केली.
वायुसेनेच्या कर्तृत्वाला सलाम करणारे पहिले आम्ही, मोदीच राजकारण करताहेत - चिदम्बरम - मोदी
पंतप्रधान मोदी हे सैन्याच्या कर्तृत्वाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पी. चिदम्बरम यांनी केली.
![वायुसेनेच्या कर्तृत्वाला सलाम करणारे पहिले आम्ही, मोदीच राजकारण करताहेत - चिदम्बरम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2607211-940-86b5450f-c021-489d-a63e-e316a0f0d812.jpg)
चिदम्बरम
सैन्याच्या कामगिरीवर आम्ही प्रश्न उपस्थित केलाच नाही. मात्र आम्ही असे करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मोदी हे पुलवामा आणि सैन्यासंदर्भातील इतर काही घटनांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पी. बी. चिदम्बरम यांनी सांगितले.