नवी दिल्ली -जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्याचा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निषेध व्यक्त केला आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना येत्या 24 तासांच्या आत अटक करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी चिदंबरम यांनी केली.
जेएनयू हिंसाचार : 24 तासांच्या आत आरोपींना अटक करा - पी. चिदंबरम
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निषेध व्यक्त केला आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही अतिशय भीतीदायक घटना आहे. देशामध्ये अराजकता माजल्याचे या हल्ल्यामधून स्पष्ट झाले आहे. विद्यापीठामध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला जातो. याहून लज्जास्पद दुसरी बाब असूच शकत नाही, असे चिदंबरम म्हणाले.
दिल्लीत जेएनयूच्या (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर जेएनयूत रविवारी हल्ला झाला. या हल्ल्यात आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. अभाविप या उजव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे