नवी दिल्ली -माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने चिदंबरम यांचे कारागृह स्वच्छ ठेवण्यास आणि त्यांना डासांपासून सुरक्षा आणि मिनरल वॉटर, देण्याचे निर्देश तिहार कारागृह अधीक्षकांना दिले आहेत.
चिंदबरम यांना तुरुंगात मिळणार मिनरलयुक्त पाणी, दिल्ली न्यायालयाचा आदेश
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
चिदंबरम यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला होता. यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालकांना एका वैद्यकीय पथक गठीत करुन चिदंबरम यांच्या आरोग्याची माहिती देण्यास सांगितले होते. आज मंडळाने हा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. त्यावर न्यायालयाने निर्णय देत डॉक्टर तुरूंगात चिदंबरम यांची नियमित तपासणी करेल, असे सांगितले आहे.
पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीग प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.